Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अहमदनगर शहरातील लष्कराच्या हद्दीतील मालमत्तेवर बांधकाम परवानगीसाठी बनावट सही शिक्यासह दाखले तयार करुन महसूल उपविभागीय कार्यालयाची फसवणूक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 6, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर शहरातील लष्कराच्या हद्दीतील मालमत्तेवर बांधकाम परवानगीसाठी बनावट सही शिक्यासह दाखले तयार करुन महसूल उपविभागीय कार्यालयाची फसवणूक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖋️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर :- बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी अहमदनगर स्टेशन हेडक्वॉर्टरच्या नावाने बनावट सही शिक्यासह दाखले तयार करुन महसूल उपविभागीय कार्यालयाची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पुणे येथील सदन कमांड मिल्ट्री इंटेलिजन्स आणि कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लष्करातील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

अहमदनगर शहरातील लष्कराच्या हद्दीतील मालमत्तेवर बांधकाम परवानगीसाठी लष्कराच्या हेडक्वार्टरचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. मात्र महसूलच्या उपविभागीय कार्यालयात काही लष्कराचे दाखले हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते.

चक्क लष्कराकडून देण्यात येणारे ना हरकत दाखलेच बनावट असल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दाखल गुन्ह्याचा तपास मोठ्या शिताफीने करत अहमदनगर मधील लष्कराच्या एका विभागातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नावं राजेंद्र देसराज सिंग ठाकूर असे असून कोतवाली पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान घडलेल्या या बनावट दाखले प्रकरणी मोठी साखळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याप्रमाणे तपास करण्यात येत आहे.

दरम्यान दाखल गुन्ह्यात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे, सलीम शेख, अभय कदम, सुमीत गवळी, बंडू भागवत, रवींद्र टकले, अतुल काजळे, दीपक बोरूडे, यांच्यासह सदन कमांड मिल्ट्री इंटेलिजन्स पुणे यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

Previous Post

६६ वा धम्मचक्र परिवर्तन दीन गोरक्षण वॉर्ड बल्लारपूर येथे साजरा करण्यात आला.

Next Post

1xBet mobi tətbiqetməsi, 1xBet APK 1xBet mobile xüsusiyyətlər

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

1xBet mobi tətbiqetməsi, 1xBet APK 1xBet mobile xüsusiyyətlər

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In