विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल नो. 9421856931
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसलगोंदी येथे सन 2024-25 मध्ये इयत्ता 8 वी वर्ग शिकणाऱ्या 8 सावित्रीच्या लेकिंना सायकल योजनेसाठी पात्र करण्यात आले.
सदर सावित्रीच्या लेकिंना माननीय चंदु गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, माननीय त्रिमूर्ती भिसे केंद्र प्रमुख सुरजागड, यांच्या उपस्थितीत सायकल वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शिला गोंगले मॅडम,मडावी सर,सडमेक सर, उसेंडी सर, मेश्राम मॅडम हे उपस्थित होते.
सायकल मिळाल्याने सावित्रीच्या लेकिंमध्ये आनंदाचे वातावरण होते.

