सामाजिक कार्यामुळे जि.पं. सदस्यपदासाठी प्रबळ दावेदारी
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी==*
दिवाळीच्या धामधुमीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, रेपणपल्ली जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्या कार्यावर विस्वास ठेवून धडाडीचे सामाजिक कार्यकर्त्या प्रभाकर डोंगरे यांचे नाव जि.पं.सदस्यपदासाठी जोरदार चर्चेत आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि समर्पित सामाजिक कार्यामुळे ते आता या सर्कलच्या जनतेच्या आशास्थानाचे केंद्र बनले आहेत.
जनसामान्यांचे नेते, हटके कार्यशैली, सातत्याने नेहमी सुखा दुःखात धावून जाणारे, समाज सेवेत अग्रेसर असणारे प्रभाकर भाऊ डोंगरे
यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणून नसून, त्यांची ‘हटके स्टाईल’ आणि गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी त्वरित धावून जाण्याची तत्परता यामुळे ते गावकऱ्यांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. प्रभाकर डोंगरे यांच्या नेतृत्वाने रेपणपल्ली सर्कलमध्ये विकासाची एक नवी दिशा दिली आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
महत्त्वाकांक्षी विकासकामांचा धडाका
डोंगरे यांनी रेपनपल्ली सर्कलमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आणि थेट जनते मध्ये राहून अनेक विकास कामे केलेले आहेत.यांच्या नेतृत्वाखाली या सर्कलमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

