विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल 9421856931
अविश्वास ठरावा नंतर फेर निवडणुकीत काँग्रेस च्या गटबाजीने केला घात
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली नगर पंचायत वर मागील सात वर्षापासून काँगेस पक्ष्याची एकहाती सत्ता होती एटापल्ली नगर पंचायत मधे मागील काही दिवसा पासून मुख्याधिकारी प्रणय तांबे आणि नगर पंचायत चे पदाधिकारी मनमानी करत असून करोडो रुपयाचे निधी चा गैरवापर करण्यात येत असल्याचे पारदर्शक एटापल्ली या नावाने सुरू असलेल्या समाज माध्यमांवर खुली चर्चा व तक्रारी cha भडिमार झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे काही नगरसेवकांनी आपली राजकीय प्रतिमा मलिन होण्यापासून वाचण्याच्या हेतूने काँग्रेस च्या नगर अध्यक्ष दीपयंती पेंदाम यांच्यावर अविश्वास प्रस्ताव टाकले होते व सदर प्रस्ताव पारित झाल्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या पोट निवडणुकीत भाजप च्या रेखा मोहुर्ले यांची निवड करण्यात आली भाजप चे 3 राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे 3 काँग्रेस 1 अपक्ष 4 असे संख्याबळाने 11 मते मिळाले तर दिपयंती पेंदाम यांना काँग्रेस चे 4 अपक्ष 2 असे 6 मते मिळाले असून 5 मताच्या घटकाने भाजप च्या रेखा मोहुर्ले या विजय झाले असून गटनेते जितेंद्र टिकले यांनी या नगर पंचायत chya फेरबदल करण्यात एटापल्ली च्या युवा वर्गांचे व पारदर्शक एटापल्ली या समाज माध्यम या ग्रुप चे काम मोलाचे ठरले असल्याचे मिडिया च्या प्रतिनिधी सोबत बोलताना मान्य केले आहे यावरून लक्ष्यात येते की सोशियल मिडिया किती महत्वाचे काम करू शकते हे एकदा पुन्हा दिसून आले आहे हे विशेष

