*अहेरी==*
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच ग्रामीण भागातही आतापासूनच निवडणुकीचे तापमान वाढल्याचे प्रचंड दिसून येत आहे. पेरमिली – राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राकरिता अनुसूचित जमाती महिला करिता आरक्षण जाहीर झाल्याने अनेक पक्षाचे कार्यकर्ते महिलांच्या शोधात लागल्याचे चित्र आहे.पेरमिली- राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रात राजाराम चे स्थनिक रहिवाशी असलेले **अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या अर्धांगिनी माजी ग्रामपंचायत सदस्य सपनाताई भास्कर तलांडे**यांची जिल्हा परिषद करिता उमेदवारी जोरदार चर्चेत आली आहे. राजाराम येथील रहिवासी असलेले अहेरी पंचायत समिती माजी सभापती हे राजकारण सोबत सामाजिक कार्यात सक्रिय असून पेरमिली- राजाराम परिसरात त्याची चांगली संम्पर्क असून सर्वांचा मदतीला नेहमीच धावून जात असतात. त्यामुळे सपनाताई तलांडे यांची जिल्हा परिषद करिता उमेदवारीची जोरदार चर्चेत आली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठकींमध्ये त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून जनतेच्या मनात असलेला विश्वास स्पष्ट दिसून येतो. अनेक युवक आणि महिला वर्गाने त्यांना खुले पाठबळ जाहीर केले आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. त्यांची उमेदवारी गंभीरपणे घेतली जात असून, स्थानिक पातळीवर नवा पर्याय म्हणून सपनाताई तलांडे यांचे नाव जोमाने पुढे येत आहे.आणि या परिसरातील जनतेची मागणी आहे.

