अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आज इतिहास घडला.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
सिरोंचा तालुका आढावा बैठकीत जनसमुदायाचा प्रचंड उत्स्फोट झाला. अजयभाऊ कंकडालवार यांच्या समक्ष शेकडो कार्यकर्त्यांनी आणि जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीं मधील सरपंच,उपसरपंच, सदस्य आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून जनआंदोलनाचे वारे आणले.गावागावातील सामान्य कार्यकर्त्यांनी आज ठरवले”जनतेचा नेता एकच, अजयभाऊच!”
सभास्थळी जयजयकार,टाळ्यांचा कडकडाट,आणि लोकांच्या डोळ्यात नव्या आशेचा तेज होता.अजयभाऊंच्या प्रामाणिक नेतृत्वाने,समाजकारणातील झपाट्याने आणि प्रत्येक घराशी असलेल्या नात्याने आज पुन्हा एकदा काँग्रेसचा ध्वज उंच फडकवला.गावकऱ्यांनी सांगितले“हा पक्ष फक्त राजकारणासाठी नाही,तर जनतेच्या हक्कासाठी आहे.”
अजयभाऊंनी आपल्या ओजस्वी भाषणातून प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आत्मविश्वासाचा दीप पेटविला.
त्यांच्या डोळ्यांत फक्त सत्ता नव्हे तर सेवा दिसत होती.त्यांनी सांगितले.“आपण सर्व एकत्र आलो तर कोणतेही अन्याय, कोणतीही विषमता मोडून काढू.”सभा संपता संपताच नव्या उमेद, नव्या दिशेने तालुका सज्ज झाला.
🌾 शेतकऱ्यांचा आवाज,तरुणांचा उत्साह, महिलांचा आत्मविश्वास या तिन्हींचा संगम आजच्या बैठकीत अनुभवायला मिळाला.अजयभाऊंच्या नेतृत्वाखाली सिरोंचा तालुका नव्या युगात पाऊल ठेवत आहे.आजचा दिवस फक्त बैठक नव्हती,तो होता जनतेच्या एकतेचा साक्षीदार दिवस आहे.

