अहेरी ==
मागील तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता पूर्ववत करण्याचं काम होत होतं — पण प्रत्यक्षात काहीच प्रगती झाली नाही.
हा रस्ता नागरिकांच्या त्रासाचं आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचं जिवंत उदाहरण ठरला होता.
परंतु उद्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी येत आहेत, आणि अचानकच हा “कोमात गेलेला रस्ता” नव्या जोमाने तयार होऊ लागलाय!
तीन वर्षे निद्रिस्त असलेलं प्रशासन आता एकदम सक्रिय झालं आहे.
अहेरी तालुक्याचं हे चित्र पाहता मनात एक प्रश्न निर्माण होतो —
जर तालुक्याचं मुख्य ठिकाणच अशी अवस्था अनुभवत असेल, तर गावपातळीवरील विकासाची कल्पना तरी कशी करायची?
आणि आता म्हणे — अहेरीला जिल्ह्याचा दर्जा मिळणार आहे!
पण जेव्हा साधा रस्ता तीन वर्षांत सुधारला जात नाही, तेव्हा जिल्हा म्हणून मान्यता मिळाल्यावर खरंच विकास होईल का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
या रस्त्यासाठी राजकारणातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सर्वसामान्य नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली, मागण्या केल्या.
परंतु कोणालाही त्याचं दुःख जाणवलं नाही.
आता मात्र मुख्यमंत्री साहेब येत आहेत म्हटल्यावर प्रशासन तत्पर झालं आहे!
मग हा अर्थ असा घ्यायचा का की —
सामान्य नागरिकांना होणारा त्रास महत्त्वाचा नाही, पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना या रस्त्यावरून जाताना त्रास होऊ नये, हेच महत्त्वाचं आहे?
जर असंच असेल तर, आमची मुख्यमंत्री साहेब आणि सर्व मंत्रीमंडळाकडे नम्र विनंती आहे की —
👉 दर महिन्याला एकदा तरी अहेरी विधानसभा क्षेत्राला भेट द्या.
आपल्या प्रत्येक भेटीनंतर आमचा “हरवलेला विकास” पुन्हा जिवंत होईल,
आणि आम्ही सर्व अहेरीकर तुमचे सदैव ऋणी राहू🙏🏻
आपलाच
अमर कांडुरवार अहेरी

