अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं-९८२२७२४१३६
सावनेर :- येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवक जागृती मंडळाचे वतीने 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस बसस्थानक जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा येथे थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजप नेते रामराव मोवाडे होते तर यावेळी वरीष्ठ पोलिस निरीक्षक मारोती मुळुक, कृउबाचे सभापती बाबाराव पाटील, युवक जागृती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बागडे, तेली समाज पंच कमेटीचे अध्यक्ष गोपाल घटे, सारस्वत पब्लिक स्कूल चे संस्थापक सचीव प्रा. साहेबराव विरखरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण रुषीया,माजी नगरसेवक राजु घुगल पतंजली योग समितीचे नेते कैलास शर्मा, राहुल सावजी, प्रामुख्याने उपस्थित होते सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पुजा अर्चना, माल्यापर्ण व अभिवादना नंतर शेकडो समाजबांधवांच्या उपस्थित सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली यानंतर मंचकावर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव विक्की शेंडे, संचालन स्तुप बागडे तर आभारप्रदर्शन होमेश्वर डोंगरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदु गोंडुळे, अंजली कनोजीया, अमीत गायकवाड, विनोद उईके, शांताराम ढोके, नारायण पारवे यांनी परीश्रम घेतले.