मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली:- आज राजकारणात स्वार्थ,पोकळ आश्वासने आणि भ्रष्टाचाराचा अंधार दाटला असताना अजयभाऊंचे कार्य म्हणजे आशेचा दीपस्तंभ आहे. कोणत्याही वादात न पडता,सर्वांना प्रेमाने जोडणारे,आदराने वागवणारे आणि लोकांशी नातं मनापासून जपणारे अजयभाऊ हे प्रामाणिकतेचे खरे प्रतीक आहेत.आज जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास ढासळला असताना या जिल्ह्यात असा एक नेता आहे,ज्याच्यावर एकाही संशयाचा डाग नाही.लोक अभिमानाने म्हणतात.*”तळं राखलं तरी पाणी चाखल्याचा आरोपही त्यांच्यावर होत.* नाही!”अनेक वर्षांच्या लोकविश्वासाने सदस्य ते जिल्हापरिषद अध्यक्ष अशी त्यांची वाटचाल घडली.कष्टकरी,शेतकरी,कामगार,वंचित घटकांचा ते खरा आवाज बनले.सभागृहातील नियम,कायदे आणि कार्यपद्धतीवर त्यांची पकड अफाट आहे.नवीन सदस्य त्यांना गुरू मानून मार्गदर्शन घेतात.
अजयभाऊंचे नेतृत्व म्हणजे सेवाभाव, त्याग आणि जनतेवरील अपार प्रेम. दुष्काळ,पाणी,वीज,शेती,महागाई, रोजगार हमी,शेतमालाचे भाव—अशा प्रत्येक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला, दिशा दिली.साधं राहणीमान, जमिनीवरची नाळ आणि ‘मी’ नव्हे तर ‘आपण’ अशी भूमिका—या गुणांमुळेच ते जनता जनार्दनाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करून उभे आहेत.
*अजयभाऊ कंकडालवार — गडचिरोलीचा बिनडाग नेता, आणि भविष्यातील दृढ, लोकाभिमुख नेतृत्वाचा अटल आधारस्तंभ.*

