जया प्रेम बसंतानी व छाया सातपुते यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज मागे. प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपच्या शारदा पटेलचा यांचा उमेदवारी अर्ज मागे. प्रभाग क्रमांक 14 मधून जया प्रेम बसंतानी यांना भाजप करणारं समर्थन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक जाहीर होताच उमेदवारीचा विषय घेऊन भाजपमध्ये रंगली होती. यात भाजप तर्फे डॉक्टर नयना उमेश तुळसकर यांना थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी आपली पत्नी जया प्रेम बसंतानी यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता. तसेच भाजपच्या छाया सातपुते यांनी देखील अपक्ष म्हणून थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत बंड केले होते. छाया सातपुते यांनी एक व्हिडिओ करून देखील आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. उमेदवारी अर्ज वापस घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांचे लक्ष या दोन्ही भाजपच्या बंडखोर उमेदवाराकडे लागून होते. भाजप तर्फे देखील बंडशमवण्याचे मोठे प्रयत्न करण्यात आले. स्वतः पालकमंत्री पंकज भोयर यांनी पुढाकार घेत प्रेम बसंतानी व छाया सातपुते यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. आज भाजप तर्फे या दोन्ही उमेदवारांनी अध्यक्ष पदासाठी म्हणून दाखल केलेले आपले अर्ज मागे घेतले आहे.
प्रभाग क्रमांक 14 मधून भाजप तर्फे नगरसेवक पदासाठी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शारदा पटेल यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. जया प्रेम बसंतानी यांचा प्रभाग क्रमांक 14 मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज असल्याने भाजपकडून शारदा पटेल यांचा अर्ज मागे घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या जया प्रेम बसंतानी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकंदरीत हिंगणघाट शहरांमध्ये सुरू असलेली बंडाची चर्चा शमली आहे हे नक्की.

