मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*कुरखेडा : -* मूळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी व गृहिणी साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी चवथ्या वर्गात असताना पासून लिखाणाला सुरूवात केली तसेच लिखाणाप्रमाणेच त्यांनी आजपर्यंत बरेच सामाजिक उपक्रम सुध्दा राबवले आहेत.त्यांनी विविध विषयांवर ज्वलंत व परखडपणे लिखाण केले आहेत. मानवी जीवनाला तसेच मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या रानभाज्या, रानफळं, कंदमुळं,वनस्पती तसेच निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाढणाऱ्या वनस्पतींचे त्यांनी संशोधन करून या प्रकारची विशेष पुस्तक लिहिली आहेत. साहित्य क्षेत्रातील ही एकमेव अशी पुस्तक आहे. त्यांचे साहित्यिक व सामाजिक सेवा बघून रेडिओ आकाशवाणी केंद्र नागपूर, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर त्यांची मुलाखत सुद्धा झालेली आहे. भारत सरकारच्या साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने व माध्यमिक आश्रम शाळा चांदाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ग्रामालोक” या कार्यक्रमात रानभाज्या तसेच रान वनस्पतींवर त्या़चे कथन झाले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना देणाऱ्या आदिवासी साहित्यिक सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम, शुभेच्छापत्र देणारे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे ,जेष्ठ साहित्यिक एडोकेट लखनसिंह कटरे, प्रसिद्ध लेखक, पत्रकार प्रा. डॉ.सुधीर अग्रवाल सोबतच अशा दुर्मिळ असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन वडसा येथे झालेल्या पाचव्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनात गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री एडोकेट आशिष जयस्वाल व पद्मश्री डॉ.परशुराम खुणे ,झाडीपट्टी संमेलनाध्यक्ष प्राचार्य के. आत्माराम, सिनेअभिनेता भरत गणेशपुरे व मान्यवरांच्या हस्ते हजारो रसिकांच्या उपस्थितीत झाले.
मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण जि.सातारा येथे जिल्हास्तरीय मायदेशी युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे आयोजन २ व ३ डिसेंबरला आयोजित केले आहे. या साहित्य संमेलनात दुर्गम भागातील गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या “रानभाज्यांच्या जगात” पुस्तकाची निवड करून त्यांना या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते रानभाज्यांच्या जगात पुस्तकाला अतिशय मानाचा पुरस्कार म्हणून मानल्या गेलेल्या “राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. साहित्यप्रेमी फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष ताराचंद आवळे यांनी कळवले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन म्हणून लाभलेले श्रीपाल सबनीस अध्यक्ष ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ,संमेलनाध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ सातारा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तसेच नावाजलेले मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संगीता ठलाल यांच्या रानभाज्यांच्या जगात पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तराहून त्या़ंचे अभिनंदन केले जात आहे.

