मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*दिनांक 26 नोव्हेंबर 2025 गडचिरोली भारताच्या लोकशाहीचा सर्वात मजबूत पाया असलेल्या भारतीय संविधानाची स्मृती जागवणारा पावन दिवस लोकशाही, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांची देणगी जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाने आपल्या प्रत्येक भारतीयाला दिली आहे. गडचिरोली येथे परमपूज्य भारतरत्न संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या हस्ते माल्याअर्पण व अभिवादन करून भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मनीषाताई मडावी जिल्हा उपाध्यक्ष जाहेदाताई शेख. लक्ष्मी कन्नाके. स्नेहल मेश्राम,सचिव तेजस्विनी भजे. पल्लवी आत्राम. तालुका उपाध्यक्ष पूनम हेमके व पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते*

