विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल क्र 9421856931.
एटापल्ली (प्रतिनिधी) – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, तालुका एटापल्लीतर्फे मा.मुख्यमंत्री यांना मा. तहसीलदार मार्फत विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी NCTE च्या नियमांनुसार TET पास अनिवार्य ठेवू नये, तसेच त्यानंतरच्या काळातील भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात सांगितले आहे की, राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून, TET अट आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे अनेक पात्र उमेदवार नियुक्तीपासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यमान रिक्त पदे तातडीने भरून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी समितीने केली आहे.
– TET संबंधी शासननिर्णयांचा पुनर्विचार करून 23.08.2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना सूट द्यावी आणि त्यांची सेवा नियमित मान्य करावी.
– प्रलंबित शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जाहिरातीनुसार रिक्त पदे भरण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करावा.
– सेवा पुष्टी, वेतनश्रेणी, पदोन्नती, ACP यांसंबंधी प्रकरणे ठराविक मुदतीत निपटावीत आणि विलंब झाल्यास जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करावी.
– नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना वेळेवर वेतन देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी आणि सध्या मानधनावर कार्यरत शिक्षकांचे वेतन तातडीने नियमित करावे
निवेदनावर एटापल्ली तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या असून, मागण्यांची लिखित पूर्तता न झाल्यास �

