मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
लगाम :- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हयात कर्करोग तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत, जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिश कुमार सोलंकी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत, डॉ . स्मिता साळवे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, मुलचेरा, डॉ. किरण वानखेडे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. प्रेषित सुरपाम, वैद्यकीय अधिकारी, लगाम यांच्या व्यवस्थापनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, लगाम येथे दि. 12.12.2025 कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, लगाम येथे कर्करोग तपासणी व्हॅनच्या माध्यमातून परिसरातील 135 लोकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मुख कर्करोग, स्तनाचे कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या महत्त्वाच्या कर्करोगांची तपासणी करण्यात आली.
* तपासणीचा तपशील:
* मुख कर्करोगाच्या 135 तपासण्या. संशयित मुख कर्करोग = 01
* स्तनाच्या कर्करोगाच्या = 46
तपासण्या. संशयित स्तन कर्करोग= 03
* गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासण्या.VIA= 35 VIA pov+ =00
Pap Smear – 10
तज्ञांकडून तपासणी व समुपदेशन
या शिबिरात तपासणी केलेल्या सर्व नागरिकांना कर्करोगाबद्दल योग्य समुपदेशन करण्यात आले. तंबाखू आणि तंबाखूजन्य सुगंधी पदार्थांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच, कर्करोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित सामान्य रुग्णालयात जाऊन आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले, जेणेकरून त्वरित उपचार करता येईल.
* तपासणी करणारे तज्ञ:
* मुख कर्करोग तपासणी: दंत शल्य चिकित्सक डॉ. वंदना पेड्डीवार्
* स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी: स्त्रिरोग तज्ञ डॉ. श्रेया मोरे
* महिलांची VIA आणि PAP तपासणी:. करिश्मा पेरामवार
* रुग्ण समुपदेशन: प्रफुल पाल NCD समुपदेशक
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, लगाम येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

