प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर झाला आहे. आता RTO अधिकाऱ्यांकडे बॉडी कॅमेरा असल्याशिवाय वाहनांवर दंड आकारला जाणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या निर्णयामुळे रस्त्यावर होणाऱ्या वादांना आळा बसण्यास मदत होणार असून, दंडप्रक्रियेत पारदर्शकता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बॉडी कॅमेऱ्यांमुळे संपूर्ण कारवाई रेकॉर्ड होणार असल्याने, वाहनचालक आणि अधिकारी दोघांच्याही हक्कांचे संरक्षण होईल. चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातोय, असा आरोप झाल्यास त्याचा पुरावा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळेल, तर नियम तोडणाऱ्यांवर योग्य कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हा निर्णय रस्ते सुरक्षेसोबतच प्रशासनातील विश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

