प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- बांधकाम कामगारांना 65 ठेकेदार व कंत्राटदारांनी 90 दिवसांचे बोगस खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालया तर्फे नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द धडक कार्यवाही सुरु केली आहे. त्यातील काही कंत्राटदारांनी आमच्या सही व शिक्क्याचा गैरवापर केला असल्याचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास लेखी निवेदन दिले असल्यामुळे कार्यालयाच्या वतीने कंत्राटरांचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. उर्वरीत काही ठेकेदारांवरी कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील दलाल, एजंन्ट, कंत्राटदार व काही संघटना यांचे धाबे दणाणले आहे.
बांधकाम कंत्राटदाराने ज्या कामगारांना प्रमाणाबाहेर नियमबाह्य पध्दतीने 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्या कंत्राटदारांवर सुध्दा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत, नगर परिषदतर्फे निर्गमित करण्यात आलेल्या 90 दिवस प्रमाणपत्रात अधिनियम कलम 1(4) अन्वये कंत्राटदाराकडे 10 पेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांनी सदर अधिनियम 7 (1) नियम 22 (1) अन्वये आस्थापनेची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच काही 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर पोलिस अधिक्षक यांच्यामार्फत देखील कार्यवाही सुरु आहे, असे सरकारी कामगार नोंदणी अधिकारी सचिन अरबट व रीना पोराटे यांनी कळविले

