पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी…
सायबर टीम शिवाजीनगर पोलीस स्टेशन
पुणे : शहराचे मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक सगो यांचे संकल्पनेतुन पुणेकरांच्या सायबर तक्रारीसंदर्भात न्याय मिळण्याकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यास सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे सायबर टिमकडे एका कंपनीचे चीफ मॅनेजर यांनी तक्रार केली कि, त्यांना मुंबई येथे हॉटेल बुकींग करावयाचे होते. त्याकरीता त्यांनी गुगलवर सर्व करून तेथे उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता सायबर गुन्हेगाराने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे क्रेडीट कार्डचा OTP घेवुन त्यांचे अकांउटमधुन फ्लीपकाद्वारे २९४३८९/- रुपयाची खरेदी केली. सदर तक्रारीचे अनुषंघाने शिवाजीनगर पोलीस ठाणे सायबर टिमने तात्काळ फ्लीपकार्टला मेल करुन तक्रारदार यांचे क्रेडीट कार्डमधुन गेलेले २८९१९७/- रु. रिफंड करण्यात यश मिळवले आहे.
तरी अनोळखी / अनधिकृत लिंकवर क्लिक करु नका, सायबर तक्रारीची नोंद http://cybercrime.gov.in या पोर्टलवर आणि १९३० या हेल्पलाईनवर तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन पुणे पोलीसामार्फत करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी परिमंडळ १ चे पोलीस आयुक्त नारनवरे मॅडम, सपोआ विश्रामबाग विभाग श्री. माने सो, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे बपोनि श्री. अरविंद माने, पोनि गुन्हे श्री. गौड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बाजीराव नाईक, पो.ह. गणपत वालकोळी, पोशि आदेश चलवादी, नवनाथ जाधव, तुकाराम म्हसके मपोशि रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

