विश्वास वाडे, चोपडा प्रतिनिधी
चोपडा:- हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण भारतभर ३१ ऑगस्टपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून चालू झालेले हे अभियान नोव्हेंबर महिन्यापर्यंत राबवले जाईल. त्यानिमित्त चोपडा येथे ७ ऑक्टोबर या दिवशी ‘हिंदूसंघटन मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक यांनी दिली.
या मेळाव्याला प्रमुख वक्ता म्हणून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सौ. क्षिप्रा जुवेकर तसेच हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक . प्रशांत जुवेकर हे असणार आहेत. हा मेळावा जुना शिरपूर रोड वरील संस्कार मंडपम या सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्वांनी कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन जुवेकर यांनी केले आहे.

