पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर
दि.०२/१०/२०२२ रोजी सांयकाळी ०७.१५ या ते ०८.१५ वा दरम्यान फिर्यादी नाम कु. रोशनी व्टिकल डिकॉन धंदा कलाकार रा. रो हाऊस नं. ८ लक्ष्मी गार्डन सोसायटी शनीमंदिर जवळ अवगाव बु. पुणे यांचे घराचे दरवाज्यामधुन आतमध्ये प्रवेश करुन हॉलमध्ये ठेवलेल्या पर्स मधील रोख ७ हजार रु. व लाकडी कपाटाचे लॉक कश्याचे तरी सहाय्याने तोडुन त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे २८.४ तोळे वजनाचे दागिने व विदेशी चलनी नोटा, भारतीय चलनी नोटा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केले आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६४८ / २०२२, मावि
कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचे प्रमाण वाढल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहोस्ट यांनी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता व पोलीस अमलदार यांना घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना देवून मार्गदर्शन केले.
त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार है पर नमुद गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणेकरता घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी. की कॅमेरे चेक करीत असताना दिनांक ०२/१०/२०२२ रोजी एक संशयीत इसम घटनास्थळाकडे जात असताना दिसुन आला. सदर ठिकाणावरील आणखीन २५ दुकानांचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करुन व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयाचे घटनास्थळावरील संशयीत इसम हा सुमीत बाबु परदेशी, रा. मदमावती, गोविंद बॅन्ड ऑफीराजवळ, पुणे हा असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणेकरता घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी. की कॅमेरे चेक करीत असताना दिनांक ०२/१०/२०२२ रोजी एक संशयीत इसम घटनास्थळाकडे जात असताना दिसुन आला. सदर ठिकाणावरील आणखीन २५ दुकानांचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करुन व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयाचे घटनास्थळावरील संशयीत इसम हा सुमीत बाबु परदेशी, रा. मदमावती, गोविंद बॅन्ड ऑफीराजवळ, पुणे हा असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सुमीत बाबु परदेशी यांचेकडे तपास करता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याचेकडे कसून तपास करताच त्याचे दिनांक ०२/१०/२०२२ रोजीचे दिनक्रमाची तांत्रिक विश्लेषणावरून त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्यास गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. अटके दरम्यान त्याचेकडुन सध्याच्या बाजारभावानुसार १४,२०,०००/- रुपयांचे २८.४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ४०,०००/- रुपयांच्या विदेशी चलनी नोटा व ७०००/- रुपयांच्या भारतीय चलनाच्या नोटा असे एकुण १४,६७,०००/- रु रुपयेचा गुन्हयामध्ये चोरीस गेलेला सर्व माल जप्त केला आहे.
आरोपी सुमित परदेशी याचेकडे गुन्हयाचा तपास करता त्याने फियांदी ही त्याची प्रेयसी असुन ती बाहेरील इसमांसोबत बोलत असल्याचा राग मनात धरून तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने यु टयुब वर चोरी कशी करावी याची माहीती घेवुन चोरी केल्याचे सांगितले आहे. सदरची कारवाई मा. राजेंद्र डहाळे सो अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. सागर पाटील
सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा श्रीमती सुषमा चव्हाण सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे. अतिरीक्त कार्यभार श्री. आर. एन. राजे, सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार गणेश भोसले, रविंद्र चिप्पा, नरेंद्र महागरे, मंगेश बोराडे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गार्ड अभिजीत जाधव, राहुल तांबे, अशिष गायकवाड, विक्रम सावंत, विश्वनाथ घोणे, अभिनय चौधरी, मितेश चोरमले, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली आहे.
