नितेश पत्रकार, तालुका प्रतिनिधी झरी
मो. नं,7620029220
झरि:- “पंचायत समितीचे झरी जामणी अंतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गापुर जणू काही बाग बनलेली आहे. शाळेत आज रोजी अनेक प्रकारचे फळझाडे सिताफळ, रामफळ, केळी, बदाम, आवळा, पपई, लिंबू, डाळिंब असे अनेक प्रकारचे झाड लावण्यात आले. आज सीताफळ मोठ्या प्रमाणात शाळेत लागू आहे. या फळांचा उपयोग शालेय पोषण आहार अंतर्गत पूरक आहार करता याचा वापर करण्यात येतो . तसेच वांगे, टमाटे, मिरच्या, कारले, तोंडरे, भेंडी असे भाजीपालाही लावण्यात आला.
या सर्वाचा वापस शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांसाठी करण्यात येतो. विविध प्रकारचे फुलझाडे लावण्यात आलेले आहे त्याच्यात गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू असे विविध प्रकारचे फुल झाड आहे. तसेच विविध प्रकारच्या वनस्पती लावण्यात आलेले आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डी. एस .यादव सहाय्यक शिक्षक पी .एम. चौधरी, शाळेतील सर्व मुले, स्वयंपाकी रूखमाताई हे सर्व खूप मेहनत घेते यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक वर्ग, गावकरी यांच्या सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात लाभते.
पंचायत समिती झरीचे गटशिक्षणाधिकारी श्री नगराळे साहेब यांचा मोलाचा मार्गदर्शन यासाठी नेहमी लाभते.