पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
“हडपसर पोलीस स्टेशन पूणे शहर
‘हातभट्टी दारू विक्रेता तडीपार’
हातभट्टी दारू विक्रेता दादाराव गोरख गोरे वय ४३ रा. स.न. ४०५. डांगमाळी आळी, हडपसर पुणे. हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरूद्ध यापूर्वी अवेध्द रित्या दारू विक्रीचे एकूण ०७ गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन येथील आहेत. आरोपी दादा गोरख गोरे याने त्याच्या वरील दाखल गुन्हे हे अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्यांचे विरुध्द मा. पोलीस उप आयुक्त परि०५ पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१), (च) अन्वये त्यांच्याकडोल कडील तडीपार आदेश क्र. ४२/२०२२, दिनांक २७/०९/२०२२ रोजी पासुन नमुद इसमासपूर्ण शहर व पिंपरी चिचवड पोलीस आयुक्तालय तरांच पुणे जिल्हा हातून २ ( दोन ) वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे.
“साडेपाच लाखांचा गांजा, चरस मुद्देमाल जप्त ‘
२) दिनांक ०२/१०/२०२२ रोजी हडपसर पोलीस ठाणे, कडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री विश्वास डगळे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे व अंमलदार असे हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, जाधव निवास, न्हावले अपार्टमेन्ट, काळेपडळ, हडपसर या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक मोकळ्या जागेत वानवडी पोलीस स्टेशनकडील अंमली पदार्थ विक्री करणारा आरोपी व एनडीपीएस गुन्हयामध्ये रेकॉर्डवरिल तडीपार आरोपी लॉरेन्स राजु पिल्ले वय ४२ वर्ष दारा माजरी ग्रामपंचायत शाळेसमोर, गोपाळपट्टी सोपानपार्क प्लेट नंबर ३०८ मांजरी ता. हवेली जि. पुणे. व त्याचे दोन साथीदार २) ऋषिकेश जगदीश भोजणे वय ३२ वर्षे रा. प्लॅट नंबर ३०८, साईश्रध्दा गोपाळपट्टी मांजरी ता.हवेली जि. पुणे. ३) मंगेश सुनिल पवार वय ३२ वर्ष रा. हर्षद अपार्टमेंन्ट प्लॅट नंबर २४, ससाणेनगर हडपसर पुणे हे २ किलो ४४८ ग्रॅम गांजा ओला सुका बोंडे व फुले असलेला व १२० ग्रॅम चरस वजनाचे ( चरस ) घट्ट पातळ द्रव्य काळया रंगाचे गोळे हे प्लॅस्टीक पिशव्यामध्ये पॅकिंग करीत असताना मिळुन आले आहे. नमुद आरोपी कडुन १ किलो ४४८ ग्रॅम गांजा आणि १२० ग्रॅम चरस, मोबाईल हेन्डसेट, वजनकाटा, गुन्ह्याकरीता वापर केलेली होन्डा अॅक्टीवा मोपेड असा किं.स. ५,५०,५२५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. १२४५ / २०२२, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (३), २९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे हे करीत असून आरोपांची दि.०८/१०/२०२२ पर्वत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. आरोपी लॉरेन्स राजू पिल्ले यास मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ५ पुणे शहर यांनी दिनांक २८/०९/२०२२ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय पुणे जिल्हा हददीतून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले असताना त्या आदेशाचा भंग करून तो मुदतीपूर्वी कसलीही परवानगी न घेता पुणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अमली पदार्थाची विक्री करीत असताना मिळून आला आहे
‘मटका जुगार अड्डयावर छापा ११ आरोपी अटक ०३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ‘
३) दिनांक ०६/१०/२०२२ रोजी १७/४० वाजण्याचे सुमारास भुई आळी, नवीन कॅनॉलच्या बाजूला फुरसुगी येथे पत्र्याच्या पडवीत मोकळया जागेत स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका जुगार घेताना खेळताना १९ आरोपींना ताब्यात घेवून त्यांचकडुन कल्याण मटका जुगार साहित्यासह, ९ मोबाईल व ४ दुचाकी वाहने असा एकुण २,९५,०७० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाणे गुर १२६३ / २०२२, महाराष्ट्र जुगार अक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना १३७७ रामेश्वर नवले हे करीत आहेत.
पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता सो, पुणे शहर यानी कार्यभार घेतलेनंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयांत कठोर व कडक कारवाई करणेबाबत व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल असे कायमच निर्देश दिले आहेत.
सदरची कामगिरी श्री. नामदेव चव्हाण सो., अपर पोलीस आयुक्त सो. पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मा. नम्रता पाटील पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ ५ पुणे शहर श्री बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, त्यांचे मार्गर्शनाखाली श्री अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वास उगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, तृप्ती खळदे म.पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार वसिम सव्यद, गिरीधर एकोगे, बाबासाहेब शिंदे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, समीर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबडे, अनिरुद्ध सोनवणे, अतुल पंधरकर यांचे पथकाने सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे..

