विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी
चोपडा:- पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.आर.आर.अत्तरदे यांच्या मार्गदर्शनाने फिट फाॅर रनचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सुमारे 50 राष्ट्रीय स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी आपले आरोग्याच्या काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून धावण्याचे महत्व स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.आर.आर.अत्तरदे यांनी विद्यार्थ्यांना ध्वज दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला व विद्यार्थ्यांना फिट फाॅर रनसाठी शुभेच्छा दिल्यात.
क्रीडा संचालक डॉ.विजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी सेवा योजना विभागाचे सहाय्य कार्यक्रम अधिकारी डॉ.अरुण मोरे, डॉ. नंदिनी वाघ व सर्व प्राध्यापक स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

