✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
हिंगणघाट (वर्धा):- कोण कधी कुणाला कशा प्रकारे फसवेल याची कुणी भविष्यवाणी करू शकत नाही. एशीच एक फसवणुकीची घटना हिंगणघाट तालुक्यात अलीपूर गावी ईराणी टोळीच्या सदस्यास लुटमार करणाऱ्या प्रयत्न करत असल्याचे माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी नाकाबंदी करून मोहम्मद अली गुलाम हुसेन याला अटक करण्यात आली आहे.
लुटमार करून आरोपी फसार झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होतात सर्विकडे नाकेबंदी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान त्याने पोलिसांच्या वाहनांवर गाडी धडकवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. आरोपी अटक झाल्यामुळे अनेक मोठे गुन्हे उघड होण्याची मोठी शक्यता आहे. मोहम्मद अली गुलाम हुसेन ( राहणार लाजपत नगर दिल्ली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहीतीनुसार, ईराणी टोळीचा एक सदस्य असलेला प्रत्येक राज्यात पाहीजे असलेला आरोपीस हिंगणघाट वना नदीच्या पुलावर सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या वाहनावर वाहन चडवनाचा प्रयत्न केला. हिंगणघाट पोलिसांनी चोरट्यास ताब्यात घेतले असून, १० ऑक्टोंबर पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीदरम्यान अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये ही टोळी फिरत असून गॅस एजन्सी व पेट्रोल पंप या चोरट्यांनी टार्गेट केल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी तालुक्यातील अल्लीपूर येथे अशोक सुपारे यांच्या गॅस एजन्सीमध्ये चोरटा विदेशी डॉलर दाखवत इंग्रजी भाषेतून रुबाब टाकत फसवण्याचा प्रयत्न करत होता.
हिंगणघाट पोलिसांनी अशा घटनेच्या अनुषंगाने सर्वत्र माहिती दिली असल्याने गॅस एजन्सीमध्ये सतर्कता होती. हा चोरटा गॅस एजन्सीमधून बाहेर पडताच गॅस एजन्सीच्या संचालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. केए.०२ एमके ०७४४ असा क्रमांक असलेली गाडी घेऊन चोरटा धोत्रा मार्गे हिंगणघाटकडे निघाला होता. हिंगणघाट येथील वणा नदीच्या पुलासमोर हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाचे शेखर डोंगरे हे चमूसह नाकाबंदी करून हजर होते. त्यांच्यासोबत हिंगणघाट येथील वाहतूक शाखेचे नितीन राजपूत, अझहर शेख हेही उपस्थित होते. चोरट्याच्या त्यावेळेस सापळा रचुन हिंगणघाट पोलिसांनी चोरट्यास ताब्यात घेतले
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर,
अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक कैलाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले यांनी केली. वाहतूक शाखेचे नितीन राजपूत अझर खान यांनी देखील आरोपीला पकडण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटणकर करत आहे.

