मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*एटापल्ली ==*
दरवर्षीप्रमाणे यंदाही एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत ठाकूर देव (बडादेव) यांच्या पूजेसाठी भव्य यात्रा भरविण्यात आली. या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या नेत्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) तसेच युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी उपस्थित राहून ठाकूर देवाचे दर्शन घेत विधीपूर्वक पूजा केली.
यावेळी अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, एटापल्ली नगरसेवक जितेंद्र टिकले, विनोद चव्हाण, सुमित मोतकुरवा, प्रा. नामदेव पेंदाम, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार, मधुकर चिलनकर, संतोष येमुलवार, महेश कुमरम, अभिलाष नागुलवार, गुरुदास आत्राम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

