मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*सिरोंचा ==*
अंकिसा. आज सिरोंचा तालुक्यातील दौऱ्यात माननीय आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना भेटून सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार यांनी मेडिगड्डा प्रकल्पावरून येण्या जाण्या करिता गेट उघडून सुविधा देण्यासाठी आमदार साहेबांना निवेदन देऊन या संदर्भात चर्चा केली असता आमदार साहेबांनी पोलिस उपविभागीय अधिकारी सिरोंचा यांना फोन वर संपर्क साधुन यावर तोडगा काढण्यासाठी उपयोजना करण्याचे सांगितले.
या निवेदनात सिरोंंचा तालुक्यातील नागरिकांना आरोग्य संबंधित आणि इतर कामांसाठी तेलंगणा मधे जातात. येथिल दोन्ही राज्यांत रोटी बेटी व्यवहार आहे. आणि तालुक्यातील मजुर रोजगार साठी दैनंदिन ये जा करतात. यामुळे दिड वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांचे मानसिक , शारीरिक व आर्थिक नुकसान होत आहे. बंद केलेले गेट उघडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा निवेदन देण्यात आले.
या संदर्भात श्रीकांत सुगरवार यांचे युद्ध पातळीवर अनेक प्रयत्न सुरू आहे . मेडिगड्डा प्रकल्पावरील गेट उघडतात की नाही या कडे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष आहे.

