रमेश अधिकारी,जिल्हाध्यक्ष*
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली.
मधुकर गोंगले उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनांक 9 जानेवारी 2026 गडचिरोली येथे
नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. अँड. प्रणोतीताई निंबोरकर यांनी काल आपल्या पदाची सूत्रे समस्त मार्गदर्शक मान्यवर यांच्या उपस्थितीत हाती घेतली.
त्यांनी गडचिरोली वासियांचे अपेक्षा पूर्ण करावे त्यांची उपेक्षा करू नये व
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शहर विकास हाच आमचा ध्यास आहे. याच ब्रीद वाक्याने ताईंच्या माध्यमातून शहरात नवनवीन विकासकामे मार्गी लागतील, याची खात्री आहे.
लोकसेवेचा नवीन संकल्प करताना गडचिरोली शहरातील विविध समस्या प्राधान्याने सोडवाव्या ही अपेक्षा, गेल्या अनेक वर्षापासून गडचिरोली शहराचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही? सर्वसामान्य गोरगरीब नागरिक यांच्या अनेक समस्या आजही आवासून उभे आहेत आयुष्यभर फुटपाथवर दुकान लावून जीवन जगणारे अनेक गोरगरिबांना वारंवार हटाव मोहिमेची झळ पोहोचत आहे. गडचिरोलीच्या जवळपास अनेक नागरिकांनी आपले जीवन जगण्यासाठी काही जागेवर अतिक्रमण करून आपली छोटीशी झोपडी उभारलेली आहे.
या झोपडींना नगरपरिषद गडचिरोली द्वारे घर टॅक्स लावण्यात यावे व स्थानिक नागरिकांना शुद्ध पाण्याची सोय चांगल्या रस्त्याची सोय व चांगले जीवन जगण्यासाठी वाट मोकळे करून देण्यात यावी, गडचिरोली शहरातील हजारो नागरिक नोटरी वर प्लॉट खरेदी केलेले आहेत ते सर्व नागरिक आजही नगरपरिषद गडचिरोली द्वारे घर टॅक्स लागू करण्यात यावे याकरिता वाट बघत आहेत, परंतु त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत गडचिरोली शहरातील गांधी चौकात नगर परिषदेची जागा व शासकीय उपलब्ध असून मोक्यावर शासकीय जागा आहे त्या ठिकाणी नगरपरिषदेद्वारे व्यापारी संकुल उभारण्यात यावे व सर्वसामान्य गोरगरीब आर्थिक कमजोर सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. गडचिरोली शहराला रात्री अपरात्री ऑटो ची व्यवस्था करून देणाऱ्या ऑटो चालक-मालक संघटना यांना स्थायी जागेची व्यवस्था करून देण्यात यावी, त्याचप्रमाणे गडचिरोली शहरातील आरोग्य शिक्षण , पाणी पुरवठा व्यवस्था सुधारावे अनेक प्रभागात कचऱ्याची विल्हेवाट अजून पर्यंत योग्य प्रकारे लागलेली नाही, वर्षानुवर्ष घर टॅक्स वाढ करीत असलेली नगरपरिषद गडचिरोली द्वारे गडचिरोली शहरांमध्ये असलेल्या महिला बचत गटांना उद्योगाची व्यवस्था कशी करता येईल व गडचिरोली शहरातील स्थानिक बचत गटांद्वारे छोटे उद्योगाच्या माध्यमातून शहरातील गोरगरिबांना महिलांना उद्योग कसे उभारून देता येईल याकरिता कार्य करावे, गडचिरोली शहरातील समस्त अतिक्रमण नियमाकुल करून देण्यात यावे, स्थानिक गडचिरोली शहरातील मुख्य तलावाचे सौंदर्यकरण करण्यात यावे. गडचिरोली शहरात बायपास रोड निर्माण झाला पाहिजे, तसेच अनेक प्रभागात आजही सांडपाण्याची व्यवस्था नाही कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी चांगली सक्षम यंत्रणा नाही, बोगस यंत्रणा चांगले काम करत आहे, स्थानिक नागरिकांच्या डम्पिंग यार्ड व्यवस्थापन, आरोग्यासाठी ॲम्बुलन्स व्यवस्था, शववाहीका, वेळेवर उपलब्ध होत नाही तसेच गडचिरोली शहराच्या प्रभागातील पथदिवे उजळण्याची व रस्ते, नाली,शौचालय व नवीन नगरात वाढीव पोलची व्यवस्था करिता आजही वाट बघत आहेत ,गडचिरोली शहरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची शहराच्या नवीन अध्यक्ष महोदया व नवनिर्वाचित नवीन व जुने नगरसेवक मान्यवर यांचे कडून शहराला न्याय मिळावा तथा शहराची वाटचाल विकासाकडे व्हावी ही अपेक्षा शहरातील नागरिक बाळगून आहेत. सर्वसामान्य गोरगरीब नागरिक व नागरिकांच्या घर टॅक्स वाढीकडे लक्ष न देता नगरपरिषद गडचिरोलीच्या इतर बाबी कडून आर्थिकते कडे व प्रत्यक्ष विकासाकडे वाटचाल कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नवीन अध्यक्ष व नगरसेवक मान्यवर यांच्यापुढे आवाहन नक्कीच आहे परंतु सर्व समस्या नगरपरिषद गडचिरोली यांनी स्थानिक काँग्रेस खासदार व भाजपा आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे सोडवाव्या हीच अपेक्षा, राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करावी,
ज्या प्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या हाकेला ओ, देत शहरवासीयांनी भाजपला नगरपरिषदेची सत्ता दिली त्यामुळे राज्यात,केंद्रात भाजपचे सत्ता असल्याने भाजपाने सुद्धा सर्वसामान्य नागरिकांचे अपेक्षा पूर्ण करावी.

