माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या हस्ते सत्कार व सम्मान.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
*अहेरी:-* धनुर्विद्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रजत पदक पटकावणाऱ्या मिथुन मडावी यांचा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.
मिथुन मडावी यांनी पिंपरी चिंचवड,पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेत रजत पदक मिळवून,त्यांची राष्ट्रीय स्तरावर पाटीयाला पंजाब येथे होण्याऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.आपल्या मेहनत,शिस्त आणि सातत्याच्या जोरावर हे यश त्यांनी संपादन केले आहे.
या प्रसंगी राजे अंब्रीशराव महाराज यांनी मिथुन मडावी यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करावी,यासाठी असे खेळाडू प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
मिथुन परशुराम मडावी हा वर्ग 12 वा राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय महागांव ता.अहेरी येथील विद्यार्थी असून शाळेतील प्राचार्य आणि वर्ग शिक्षकांनी त्याला वेळो वेळी योग्य मार्गदर्शन केले.सत्कार स्वीकारताना मिथुन मडावी यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक,कुटुंबीय व शाळेतील शिक्षक यांना दिले.

