पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी…..
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे शहरातील हदीमध्ये मसाज सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालणा-या मसाज पार्लर मध्ये कारवाई करणे बाबतचे वरिष्ठांनी आदेश दिले असताना दि. ०६/१०/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागास कोरेगाव पार्क पुणे येथे मसाज स्पा सेंटरचे नावाखाली वेश्याव्यवसाया करिता मुली ठेवून त्यांना पुरुष गि-हाईकांना मसाजच्या नावाखाली पुरवून त्यांचेकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने मा. वरिष्ठांनी कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेशित केले.
त्याप्रमाणे सदर स्पा सेंटर मध्ये बनावट गि-हाईकास पाठवून खात्री करून छापा टाकुन स्था चालवणारे २ पुरुष आरोपी इसमास ताब्यात घेतले व वैश्याव्यवसायकरीता त्यांचे ताब्यात असलेल्या चार परदेशी महिलांची सुटका केली, त्यांचेकडे अधिक चौकशी करता ते मसाज सेंटरमध्ये मसाजचे नावाखावली स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मसाज करणा-या महिलांकडुन वेश्यागमन करवून घेत होते. सदर करावाईवेळी एकुण २८,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण सहा आरोपीविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १०५/२०२२ अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ भा. दं. वि. कलम ३७० ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री संदीप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री श्रीनिवास घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार राहा. पोलीस निरिक्षक अश्विनी पाटील पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, मोम मनिषा पुकाळे, पो. अंमलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे, प्रमोद मोहिते, संदीप कोळगे, अमित जमदाडे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

