युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ 9923296442
गोंदिया:- शहरातील सावराटोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात अनोळखी संशयितरित्या फिरणाऱ्या हे चार जणांना येथील रहिवाशांनी चांगलाच चोप दिला. हे आरोपी मुले चोरणाऱ्या टोळीच्या संसयीत असल्यामुळे नागरिकांनी पकडून गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली त्यांच्याजवळ कुणी बालके आढळली नसली तरी आरोपींनी सहा ऑक्टोबरला सावरटोली इथून एका बारा वर्षे बालकांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नागपूर जिल्हातील विविध गुन्हा त्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
गोंदिया शहरातील गोशाला वार्डातील एक बारा वर्षे मुलगा सहा ऑक्टोबर रोजी शिकवणी वर्गासाठी जात असताना दोन आरोपींनी त्याला पकडून सोबत चलन आता कुऱ्हाडीने मारून टाकू अशी धमकी दिली होती. आरोपीने कमरेत कुराड लपून ठेवली होती त्या दोघां सोबत मुलाने आवाज करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी याच रस्त्याने चार-पाच मजूर सब्बल घेऊन कामावरून घरी परत असताना आरोपींनी त्याला पकडून पाहून त्या ठिकाणी पळ काढला तो कसा बसा क्लासला पोहोचला तेथे तो भयभीतच होता घरी परतल्यानंतर त्यांची माहिती त्यांनी आपल्या आई-वडील दिली. त्यानंतर पोलिसांनी सूचना दिल्यानंतर यंत्रणा सतर्क झाली दुसऱ्या दिवशी पुन्हा आले आरोपी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता त्या आरोपी पैकी तीन आरोपी पुन्हा त्या बालकाच्या घराजवळ गेले असता त्या बालकांनी त्याला ओळखले आणि त्यांची माहिती वडिलांना दिली त्यांना पकडण्यासाठी घराबाहेर येताच आरोपी पळू लागले परंतु लोकांनी त्यांना पकडून पोलिसाकडे सोपविले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या.

