एआयवायएफ (AIYF) तालुका अध्यक्ष रवी बारसागंडी यांची विशेष उपस्थिती.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील रहिवासी श्री. पुरुषोत्तम मुडमडीगेला यांच्या मुलीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कौटुंबिक सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमाला ऑल इंडिया युथ फेडरेशनचे (AIYF) सिरोंचा तालुका अध्यक्ष रवी बारसागंडी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी चिमुकलीला पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या उज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
वाढदिवसाच्या या आनंदोत्सवात मुदमडीगेला कुटुंबातील सदस्य, वा महेंद्र दुर्गम ग्रामपंचायत जप्राबाद सदर्स नातेवाईक, मित्रपरिवार आणि टेकडा ताल्ला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरगुती वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुरुषोत्तम मुडमडीगेला यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

