मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील पेरमिली नजीक असलेल्या आरेंदा येथील तरुण युवक साधू तलांडी वय (२५) हा हेमलकसा येथील कार्यकारी अभियंता कार्यालय अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कामगार पदावर कार्यरत होता. दि. 10 जानेवारी रोजी मनेराजाराम जवळील परली या गावात विद्युत सहाय्यक सोबत विद्युत दुरुस्ती करिता गेले होते. सदर कार्यालयाकडून 11 केव्ही ची विद्युत लाईन बंद न करताच सदर युवकाला विद्युत खांबावर चढविण्यास भाग पाडले . सदर युवक विद्युत तारांना स्पर्श करताच शॉक लागून त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला.
महावितरण कडून सुरू असलेल्या कंपनीच्या ठेकेदारी कामात गंभीर निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे. सदर घडलेली घटना गंभीर असल्याची बाब लक्ष्यात येताच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले यांच्या नेतृत्वात व इंडियन दस्तक न्यूजचे संपादक सुरेश मोतकुरवार, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे महिला जिल्हाध्यक्षा नीलिमाताई बंडमवार, पत्रकार मोहसीन शेख, राकेश तेलकुच्ची, जितेंद्र दागम, राजेश कुमरे, यांनी मृतक परिवाराना भेट देऊन सात्वन करत आर्थिक मदत करण्यात आले. यावेळी मृतकाचे आई-वडील, भाऊ सुधाकर तलांडी, सरपंच व्यंकटेश तलांडे,सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बंडमवार,रामजी आत्राम, उपसरपंच बुजी आत्राम, वंजा वेलादी, राकेश महा, संदीप तलांडे, पालीकराव आलाम तसेच गावकरी उपस्थित होते.
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने त्वरित पेरमिली पोलीस स्टेशनला भेट देत प्रभारी अधिकारी दिपक सोनुने यांच्याशी चर्चा करण्यात आले. संबंधित विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतक परिवार व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने केली आहे.

