सौ. हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
बल्लारपूर:-डॉ. सुनील कुलदीवार, भास्कर माकोडे, हरीश शर्मा आणि घनश्याम मूलचंदानी यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड
बल्लारपूर:चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद तसेच मिनी इंडिया म्हणून बल्लारपूर शहराचा उल्लेख केला जातो २ डिसेंबर रोजी बल्लारपुर नगर परिषदेची निवडणूक व २१ डिसेंबर रोजी लागलेल्या निकाला नुसार काँग्रेस पक्षाचे १७, भाजपचे ७ शिवसेना(उबाठा) ५ राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) ३ शिवसेना(शिंदे) १, अपक्ष १ असे बल्लारपूरात ३४ नगरसेवक निवडून आले.त्यानुसार बल्लारपूर नगर परिषदेत उपअध्यक्षपढ़साठी व ४ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यासाठी दि .१२/०१/२०२६ रोजी दुपारी १ वाजता बल्लारपूर शहरातील गोंडराजे बल्लारशाह नाट्य गृहात बल्लारपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले.
सदर सभा सौ. अल्काताई वाढई नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
उपनगराध्यक्ष पद निवडनुकसाठी काँग्रेस पक्षाने उपनगराध्यक्षसाठी पक्षाचे माजी अध्यक्ष देवेंद्र आर्य यांना उमेदवारी दिली, ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नगराध्यक्षपद सह १७ नगरसेवकाला निवडुन आले .
उपनगराध्यक्षसाठी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्याकडे नामांकन सादर करायचे होते. तथापि, विरोधकांनी एकही नामांकन सादर केले नाही, परिणामी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवेंद्र आर्य यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली.
तसेच स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेस पक्षातर्फे भास्कर माकोडे, डॉ. सुनिल कुल्दीवार, भारतीय जनता पार्टीचे हरीश शर्मा, तर शिवसेना (उबाठा) तर्फे घनश्याम मुलचंदानी यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली .
उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र आर्य यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जेष्ठ नेता संतोष सिंह रावत, नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई, प्रभारी शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख आणि भास्कर माकोड़े यांचे आभार मानले.
तसेच बल्लारपूर शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
या सभेला विशाल वाघ मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, कोंग्रेस पार्टीचे गट नेता अब्दुल करीम शेख,भाजपाचे गट नेता महेंद्र ढोके,शिवसेना (उबाठा) चे गट नेता सिक्की यादव,राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) चे गट नेता सुमित डोहने, नगरसेवक छाया मडावी ,वैष्णवी जुमडे ,पवन मेश्राम ,शिल्पा चूटे ,
अंकूबाई भुक्या,मोना धानोरकर ,
वैशाली हुमने ,प्रियंका थूलकर ,
सय्यद मुकद्दर ,मेघा भाले, शारदा माकोड़ों ,इस्माईल ढाकवाला ,
सुनीता जीवतोडे,रवि मातंगी
करुणा रेब्बावार,लखन सिंह चंदेल,मोहित डंगोरे ,नीरज झाड़े ,शालू कुमरे ,किरण सिंह चंदेल, विद्या खरतड ,रंजिता बीरे,मनोज बेले, काजल तोटावार,रजनी मूलचंदानी , शाजिया शेख ,प्रणीत सातपुते , अविनाश मट्ठा आणि सलीम नबी अहमद यांच्यासह नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्याची उपस्थिती होती.

