एटापल्ली तालुक्यातील विविध पक्षांना धक्का.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*एटापल्ली :* अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा,कर्तृत्ववान व जनतेशी थेट जोडलेल्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथे शेकडो नागरिकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.या पक्षप्रवेशामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून विविध पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
राजे साहेबांची लोकाभिमुख कार्यशैली, सातत्याने जनतेशी असलेला संवाद व विकासासाठीची ठाम भूमिका यामुळे प्रेरित होऊन विविध गावांतील नागरिकांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
या प्रसंगी राजे साहेबांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत करत,सर्वांना सोबत घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पक्ष प्रवेश शामराव दोरपेट्टी,विजय चिपकुर्तीवार,संतोष पुंगाटी,संजय लेकामी, राकेश आलाम,बिरगू हिचामी,सीमा कोरमी, देवाजी हिचामी,राजू पदा,सत्तू हिचामी, प्रवीण आलाम,विनोद हेडो,चंदू हिचामी, अर्जुन नाडवी,शामराव शेडमेक,सरिता पुंगाटी,विजू दोरपट्टी,केशव वड्डे,मुकेश हिचामी, नंदू नावडी,राकेश हिचामी यांच्यासह हेडरी,जांबिया,पार्सलगुंदी, आलेंगा,मंगेर,टिटोळा,गट्टा,पुसूमपल्ली,नेडेरया गावांतील शेकडो नागरिक उपस्थित होते.!

