पातागुडमचे पोलीस प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे यांचे हस्ते बसचालक व वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्यातील शेवटचा टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील
अती दुर्गम आणि छत्तीसगड सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम या गावात बस सेवा सुरू व्हावे यासाठी अनेक दिवसांपासून स्थानिक लोकांची मागणी होती. त्यासाठी पोलीस प्रशासन, स्थानिक नेते तसेच पत्रकार बांधव यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर एस टी महामंडळाद्वारे सिरोंचा ते पातागुडम बस सेवा सुरू करण्यात आली. त्याबद्दल बस चालक व वाहक यांचा पातागुडम पोलीस स्टेशन तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी ज्ञानेश्वर धोत्रे, PSI मंगेश कोठावळे, PSI स्वाती बाष्टेवाड,ASI रामटेके, सरपंच मल्लेश दुर्गम, सीडाम सर व इतर पोलिस स्टाफ उपस्थित होता. भविष्यात अजून बस फेऱ्या सुरू करणार असल्याचे ST महामंडळाद्वारे सांगण्यात आले.

