मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809
*अहेरी:-* तालुक्यातील महागाव येथील अशोक टेकुल यांनी झाडावरून खाली पडल्याने यांना गंभीर दुखापत झाले असल्याने उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कुटूंबातील सदस्य पुढील उपचार खाजगी रुग्णालयात कसा करावा या विवंचनेत होते.परंतु अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना ही बाब कळताच त्यांनी आपले भाजपचे तालुका अध्यक्ष विकास तोडसाम व महागाव बूजचे उपसरपंच संजय अलोने यांना पाठवून टेकुल कुटूंबाला धीर दिला आणि अशोक टेकुल यांच्या पुढील उपचार खाजगी रुग्णालयात करण्यासाठी १५,००० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.आणि आपण पुन्हा सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी टेकुल कुटूंबाने राजे साहेबांचे हृदयातुन आभार मानले.!
यावेळी स्थानिक भाजपचे पदाधिकारी/कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते!

