मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील उप प्रादेशिक अहेरी ( उच्च श्रेणी ) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत खरीप पणन हंगाम धान खरेदी केंद्राचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते फित कापून धान खरेदी सुरूवात करण्यात आले आहे.
अधिकृत केंद्रावराच धान विक्री करा ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाला आहे.त्यांनी आपल्या धान विक्री करावे आणि ज्यांच्या ऑनलाइन नोंदणी झाले नाही.त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये आणि शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे येथील शेतकरी बांधवाना आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी केले.इंदाराम येथे धान खरेदीला सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी परिसरातील शेतकरी बांधव व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

