मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा-
वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. असे प्रतिपादन *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अ.प.गट)कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केले.*
सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत वेंकटापूर हद्दीतील *वेंकटापूर, बामणी, वेनलाया,* अंगणवाडी, आरोग्य पथक व ग्रामपंचायत परिसरात, शालेय परिसर व मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.*राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम व सरपंच अजय आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.*
वाढदिवसाच्या निमित्याने वृक्षारोपण, जंगल निर्मिती संवर्धन, स्थलांतरीत वृक्षारोपण व लागवड योजनेचा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊंन मुख्याध्यपकांच्या परवानगीने *सरपंच अजय आत्राम* यांनी पर्यावरण पूरक योजनांची माहिती दिली.
यावेळी *राकॉचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, सरपंच अजय आत्राम,सडवली कार्सपल्ली,राकॉ सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, श्रीनिवास घोडाम, गणेश रच्चावार,बक्कय्या पंद्राम,नागेश मोहुर्ले, नरेश कोटरंगे, श्रीनिवास कुळमेथे,राहुल कुमराम, नागेश मडावी, रमेश कुमरामसह* ग्रामपंचायत वेंकटापूर हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अप गटचे)पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

