अहेरीचे गट विकास अधिकारी यांना स्मरणपत्र दिले.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत यापूर्वी दिनांक 12/01/2026 रोजी आंदोलनाचे निवेदन सादर केला होता. सदर निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्यांबाबत शासनाने विहित कालावधीत कोणतीही दखल घेतलेली नाही अथवा सकारात्मक निर्णय कळवलेला नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.
मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे व जबाबदारीने शासनाची अत्यंत महत्त्वाची कामे पार पाडत असूनही, त्यांच्या नियमितीकरण, सेवा-सुरक्षा व समान वेतन यासारख्या मूलभूत मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर स्मरणपत्र (Reminder) म्हणून सादर करून त्याच पत्राद्वारे कळविण्यात आले की शासनाने आंदोलन निवेदनाची दखल न घेतल्यामुळे व कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने दिनांक 23 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्र राज्यातील मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात करीत असल्याचे बोलले जात आहे आहेत.
*आंदोलनाचा स्वरूपः*
सर्व कार्यालयांमध्ये काळ्या फिती लावून निषेध आंदोलन,कामकाज करत शांततामय मागणी निषेध नोंदविणे, पुढील टप्प्यात आवश्यक असल्यास तीव्र आंदोलन/उपोषण/कामबंद आंदोलन,या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास किंवा कामकाजावर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन व संबंधित विभाग जबाबदार राहतील.
तरीही परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मनरेगा कंत्राटी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहा. कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने
अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या स्मरणपत्रातुन मागणी केली आहे. स्मरणपत्र सादर करताना कार्यक्रम सहाय्यक अधिकारी नेहरू गोवर्धन,तांत्रिक अधिकारी नागेश शेनीगारपू, मनोज पडिशलवार, व्येंकटी कावरे, क्लर्क कम डेटा एन्ट्री आपरेटर खुशाल कंकनालवार, जरीना शेख उपस्थित होते.

