मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
आलापल्ली ==
या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांमध्ये आपुलकी, सामाजिक सलोखा तसेच भारतीय संस्कृतीतील पारंपरिक सणांचे जतन व्हावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शाहीनताई हकीम या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून केकिता बाळापुरे, प्राजक्ता विजय चौहान, मीना ताई दुर्गे तसेच राणी दुर्गावती महाविद्यालयाचे प्राचार्य लोनबले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना कशाप मॅडम यांनी केली. त्यांनी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करून महिलांमधील एकोपा, स्नेहभाव व परंपरांचे जतन यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व महिलांना पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले. खेळीमेळीच्या, आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला. पारंपरिक गाणी, आपुलकीचे संवाद व हास्यविनोदामुळे महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी टे पाले मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे, आयोजकांचे, शिक्षकवर्गाचे व उपस्थित महिलांचे मनःपूर्वक आभार मानले.
राणी दुर्गावती विद्यालय व दृष्टी फाउंडेशन यांच्या या संयुक्त उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. महिलांमध्ये सामाजिक बांधिलकी व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा कार्यक्रम शांततेत व उत्साहात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

