विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल क्र 9421856931
बरसेवाडा ते चंदनवेली अवघ्या चार किलोमीटरचा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून अत्यंत खराब व दुर्लक्षित अवस्थेत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून आजतागायत या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेले नाही. परिणामी हा रस्ता प्रत्यक्ष वापरण्यायोग्य राहिलेला नाही.
रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, या मार्गाने प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे बरसेवाडा व चंदनवेली परिसरातील नागरिकांना फक्त 4 किमीच्या अंतरासाठी 15 ते 20 किलोमीटरचा अतिरिक्त मार्ग वापरून जिल्ह्याच्या दिशेने जावे लागत आहे. या अनावश्यक फेऱ्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा व इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
या रस्त्यावरून विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, कामगार तसेच ग्रामस्थांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र खड्ड्यांनी भरलेला रस्ता, चिखल व तुटलेली डांबरीकरण यामुळे वाहनांचे सातत्याने नुकसान होत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी भयावह बनते, तेव्हा हा रस्ता अक्षरशः बंद अवस्थेत जातो.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा व इतर अत्यावश्यक वाहने वेळेत पोहोचू शकत नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. छोट्या अंतरासाठी मोठा फेरा मारावा लागत असल्याने आरोग्य, शिक्षण व शेतीशी संबंधित कामांवरही विपरीत परिणाम होत आहे.
या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला �

