श्री राधा गोविंद मंदिर सिमूलतला ता, चामोर्शी येथे आजपासून भव्य महानाम संकीर्तन व यज्ञास प्रारंभ.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनांक 30 जानेवारी 2026
घोट जवळील सिमूलतला येथील श्री, श्री, राधा गोविंद मंदिर येथे आजपासून दरवर्षी प्रमाणे आयोजित महानाम यज्ञ संकीर्तन कार्यक्रमास भव्य शुभारंभ झाले
उपस्थितांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी मार्गदर्शन केले व सांगितले बंगाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कटीबद्ध आहे व आगामी काळात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने बंगाली समाजाच्या विविध प्रलंबित समस्यांना घेऊन विराट जनआंदोलन करण्यात येईल प्रलंबित मागण्या व समस्या शासन दरबारी मांडण्यात येईल असे प्रतिपादन केले,
यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने डॉ खुणे यांना पिवळा सदरा कुर्ता भेट देण्यात आले पगडी बांधून सन्मान करण्यात आला व सर्व नागरिक व महिला भगिनी यांच्या हरेराम हरेकृष्ण हरेकृष्ण, राधे, राधे जयघोष सोबत मेणबत्ती आणि दिव्याची आरती घेऊन संपूर्ण मंदिर परिक्रमा केला,
व यावेळी राधे नाम, हरेराम, हरे कृष्ण, हरेराम,या संपूर्ण नावाने संपूर्ण सिमूलतला ग्राम दुमदुमला
मंदिर समितीच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांसाठी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी भव्य महाप्रसादाचा आयोजन करण्यात आला होता
यावेळी येथील मंदिर कमेटी पदाधिकारी कार्यकर्ते व प्रामुख्याने शामल दास, तपन माझी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष किशोर कुंडू व संगठन नेते प्रवीण भाऊ गेडाम व मान्यवर तथा गावकरी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

