मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा – तालुक्यातील ग्रामपंचायत वेंकटापूर हद्दीतील ग्लसफोर्डपेठा येथील दुर्गाय्या कावरे यांच्या चार वर्षांपूर्वी दुःखद निधन झाली असून दहा दिवसापूर्वी सुमित्रा दुर्गाय्या कावरे यांच्या दीर्घ आजाराने दुःखद निधन झाली.
*मयत दुर्गाय्या व सुमित्रा यांच्या दुःखद निधन झाल्यामुळे* यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि कुटुंब गरीब असल्यामुळे तेरवी कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक मदत लागत असल्याची माहिती मिळतच बानय्या जनगाम यांनी वेळेचा विलंब न करता *आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम* यांनी ग्लसफोर्ड पेठा गाठून सामाजिक बांधिलकी जपत *मयत सुमित्रा दुर्गाय्या कावरे* यांच्या तेरवी कार्यमाला त्यांचा मुलगा संतोष कावरे यांना आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी *राकॉचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, सरपंच अजय आत्राम,सरपंच सूरज गावडे,ग्रापं सदस्य रवी कार्सपल्ली,रमेश शिवराला, वेंकटी कावरे,रामय्या गोदारी, संतोष कावरे, राजेंद्र कावरे, रोहन अल्लूरी, श्रीनिवास दिकोंडा, सडवली कार्सपल्ली, बापू कावरे, अविनाश कुम्मरीसह* ग्लसफोर्डपेठा गावातील राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गटचे) पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

