राष्ट्रवादी काँग्रेस(अ.प गटाच्या) पदाधिकाऱ्यांचे प्रमुख उपस्थिती.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा : तालुक्यातील *रोमपल्ली येथे गोटूलभूमी क्रिकेट मंडळाच्या वतीने* टेनिस बाॅल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम यांच्या हस्ते करण्यात आले.*
*या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत बोरमपल्लीचे सरपंच दिवाकर कोरेत उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अविका रोमपल्लीचे अध्यक्ष ईरपाजी मडावी हे होते,रोमपल्ली येथील प्रतिष्टीत नागरिक बंडूमामा, गावडे,ग्रामपंचायत सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यम पिडगू,नरेश संघर्ती,ग्रामपंचायत वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम,ग्राम पंचायत गरकापेठाचे सरपंच सूरज गावडे होते, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रापं सदस्य प्रशांत गावडे,सिरकोंडा येथील लिंगा गावडे,वंजा तलांडी ,बबन गावडे, कोरके गावडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला उपस्थित होते.*
प्रास्ताविकेतून *राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम यांनी उपस्थित खेळाळुना योग्य मार्गदर्शन केले.* सूत्रसंचालन जिल्हा परिषद रोमपल्लीचे शिक्षक अशोक लक्कमवार तर आभार महेश मडावी यांनी मानले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष रामा कुरसम उपाध्यक्ष भीमराव मडावी, सचिव महेश गावडे,कोषध्यक्ष महेश मडावी,सहसचिव नागेश वरसे,उपकोषध्यक्ष लक्ष्मण कुळमेथे,क्रीडा प्रमुख चंद्रकांत मडावी उपस्थित हाेते.
गोटूलभूमी क्रिकेट क्लब रोमपल्लीच्या वतीने आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी *प्रथम पारितोषिक अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून 31 हजार रोख रक्कम,द्वितीय पारितोषिक राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम व ग्रामपंचायत सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे व तृतीय पारितोषिक रोमपल्ली येथील प्रतिष्टीत नागरिक बंडूमामा गावडे व सरपंच दिवाकर कोरते यांच्याकडुन देण्यात आली आहे.*
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परमेश्वर गावडे,उमेश मडावी,मनोज मडावी,संतोष मडावी,मल्लेश कुळमेथे,नागेश मडावी,श्रीराम गावडे,उमेश मडावी, सीताराम गावडे, विजय कुळमेथे,नागेश मडावी, संतोष गावडे, श्रीनिवास मडावी, सतीश मडावी, कृष्णा मडावी, लक्ष्मण गावडे,उमेश गावडे, कैलास मडावी, बंडू गावडे, संतोष मडावी, अनिल मडावी,सिरिया कुळमेथेसह रोमपल्ली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गटचे )पदाधिकारी व कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

