अबुजमाड मधील अभियानाबद्दल माहिती.
सदर घटनास्थळावरून आज सकाळी आणखी दोन माओवादी (१ पुरुष व १ महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ३ माओवादी (२ पुरुष व १ महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याकडून १ एके-४७ व १ एसएलआर शस्त्र जप्त करण्यात आले आहे. तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
जखमी C-60 जवान दिपक चिन्ना मडावी, वय ३८ वर्षे, सध्या राहणार अहेरी व मूळ पत्ता मांड्रा, दामरांचा, तालुका अहेरी यांना आज पहाटे अबुझमाड येथील घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय भामरागड येथे आणण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने अभियानादरम्यान झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना वीरमरण आले आहे.
सदर अभियानादरम्यान आणखी एक जवान जोगा मडावी, रा. किष्टयापल्ली हे रात्री गोळी लागून जखमी झाले होते. त्यांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून भामरागड येथे आणण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच गडचिरोली येथे हेलिकॉप्टरच्या मदतीने आणण्यात येणार आहे.
सदर जंगलपरिसरात शोध मोहीम सुरू असून गडचिरोली पोलीसांकडून पुढील माहिती देण्यात येईल.
