राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम यांच्या पाठपुराव्याला यश.
मधुकर गोंगले,उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गेल्या अनेक वर्षापासून सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कोर्ला या परिसरातील बससेवा बंद आहे़. यामुळे या भागातील शालेय विद्याऱ्थ्यांसह प्रवाशांना प्रचंड मनस्तान सहन करावा लागत आहे़.या गंभीर बाबीकडे *राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम* यांचे लक्ष वेधित *सिरोंचा-कोर्ला-झिंगानूर* मार्गे तत्काळ बस सुरु करण्याची मागणी निवेदनातून केली.
*राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम* यांनी वेळोवेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम तथा अहेरी आगारातील अधिकाऱ्यांना पाठपुरावा केली असून दिलेल्या निवेदनाची दखल घेत *आमदार धर्मराव बाबा आत्राम* यांनी *महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या अहेरी आगार येथील अधिकाऱ्यांना बस सुरु करण्याची निर्देश दिले* त्यानुसार सिरोंचा-कोर्ला – झिंगानूर बस सुरु केल्याने परिसरातील नागरिक आनंद व्यक्त केली आहे.आणि नागरिकांची प्रवास सुखकर झाली आहे.

