नवीन कंपनी संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या व अडचणी दूर करण्याबाबत चर्चा.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*एटापल्ली :-* तालुक्यातील पिपली येथे प्रस्तावित नवीन कंपनीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी अहेरी येथील ‘रुख्मिणी महाल’ येथे जाऊन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना विविध गावातील समस्या जाणून घेण्यासाठी निमंत्रित केले होते.त्यानुसार राजे साहेबांनी गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
नवीन कंपनीमुळे प्रभावित पिपली,जवेली,कुंडम,जिजावंडी,बुर्गी,वेडमागड,गणपहाडी,नैणवाडी व टोला या गावांतील नागरिकांनी नवीन कंपनीमुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला तसेच स्थानिक युवकांना प्राधान्याने योग्य पदावर रोजगाराची संधी याशिवाय रस्ते,शिक्षण व आरोग्य सुविधा बाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी राजे साहेबांनी गावकऱ्यांच्या सर्व समस्या आणि त्यांच्या अडी-अडचणी शांतपणे ऐकून घेतल्या.मी तुमच्या पाठीशी सदैव आहो.जल,जंगल,जमीनीचे खरे मालक तुम्ही आहात.तसेच तुमच्या सर्व समस्या या येणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला विश्वासात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करू’ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीस प्रत्येक गावातील प्रमुख नागरिक तसेच युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

