*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती.!*
*एटापल्ली :-* तालुक्यातील शिवशक्ती शिवउत्सव समिती जारावंडी/कांदळी यांच्या सौजन्याने महाशिवरात्रीच्या पावन महोत्सवानिमित्त ‘ *राधे राधे झांकी’* या भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.उपस्थित भाविकांना त्यांनी शुभेच्छा देत धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.
यावेळी ‘ *राधे राधे झांकीचे’* सादरीकरण आकर्षणाचे केंद्र ठरले.
या कार्यक्रमात युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते रमेशजी बच्छाड,भाजप जिल्हा सचिव मोहन नामेवार,निरपद रॉय,संजू सेन,सपन करमरकर,सरपंच पप्पू येरमे,प्रविण मुरत्तीवार,कमल मंडळ,कमांडर मंडळ,तुषार वेल्डिंग,मोरेश्वर सिडाम,नरेश सिडाम,रोहित मडावी,चिंना पेदापल्लीवार तसेच जारावंडी/कांदळी येथील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

