मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील राजाराम येथील जय बिरसा मुंडा मंडळ राजाराम द्वारे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हॉलीबॉल स्पर्धेची उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समीर संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली होती.
या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेस नेते हणमंतू मडावी यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.तर द्वितीय पारितोषिक राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगोनीवार,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद आत्राम कडून तसेच तृतीय पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,राजाराम ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय पोरतेट कडून देण्यात आली आहे.
आज बक्षीस वितरण कार्यक्रमांचे अध्यक्ष राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगोनीवार होते. बक्षीस वितरक म्हणून माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,होते.
यावेळी मंचवर नागेश कन्नाके माजी सरपंच,संजय पोरतेट,अवलमरी सरपंच अक्षय पोरतेट,बंडे मडावी,दिपक आलम,मंडळंचे अध्यक्ष श्री.संदीप आत्राम,आशिष गावडे, अक्षय पोरटेट,श्रीनिवास मडावी,परशुराम सडमेक,विशाल सोयाम,अजय पोरतेट,चंद्रशेखर दादा, वेंकटी मडावी,लक्ष्मण कंबागोनीवार, राकेश मडावी,गजानन मडावी यांच्या सह परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

