नामकरण सोहळा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजाराम पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंद आवारे उपस्थित
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील
देशासाठी प्राणांची आहुती देणारे शूरवीर जवान शहीद दिनकर बोदय्या अर्का यांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2005 रोजी भामरागड तालुका धोडराज येते शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी राजाराम येथे “शहीद दिनकर बी. अर्का चौक” असे नामकरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले होते.
या प्रसंगी ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, माजी सैनिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकात शहीद दिनकर अर्का यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. उपस्थितांनी “भारत माता की जय” आणि “शहीद दिनकर अर्का अमर रहें” अशा जय घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सुरवीर जवान शहीद दिनकर अर्का यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले असून त्यांचे शौर्य आणि त्याग येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला हा चौक म्हणजे गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञतेची भावना आहे.
राजाराम गावात उभारण्यात आलेला “शहीद दिनकर बी. अर्का चौक” हा पुढील पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणा देणारा स्मारक ठरणार आहे हे विशेष
सदर फलकाचे अनावरण शहीद दिनकर अर्का यांचे वडील व आई मैनाबाई बोदया अर्का पत्नी शारदा दिनकर अर्का, मुलगा प्रीतम व प्रथम व बहीण मंजुळा पेंदाम, पंचफुला सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक अवारे साहेब, उपसरपंच रोशन कंबगोणीवार, ग्रा. पं सदस्य,रमेश पोरतेट, विनायक आलाम, संजावली अरगेला,यशोदा आत्राम, शाळा व्य. स अध्यक्ष अरविंद परकीवार,त. मु. अध्यक्ष मुता पोरतेट,संजय पोरतेट, दिपक आलाम, माजी सदस्या सपना मारकवार, अनिता आत्राम, प्रेमीला मडावी,जितेंद्र गड्डमवार जयराम दुर्गे, गोपाल चंदनखेळे, मनोज आकदर,राकेश सडमेक, सुरेश मोतकुरवार, राहुल कंबगोणीवार, महादेव आत्राम,भगवान तलांडी, आदी उपस्थित होते.
आयोजन समितीचे भास्करभाऊ तलांडे माजी सभापती अहेरी, विनोद सिडाम,दिपक अर्का मनोज सिडाम, शंकर सिडाम कपिल सिडाम, दिपक आत्राम, सुरज तलांडी, संकील सिडाम, अरविंद आत्राम, प्रवीण अर्का, प्रकाश अर्का, संजय अर्का, सखाराम अर्का,जीवन अर्का, समय्या आत्राम, रोहित अर्का विवेक सिडाम,अर्का, सतीश सडमेक, धर्मराव आत्राम, भगवान सिडाम,त्रिशुल अर्का,मधुकर आत्राम, स्वप्ननिल अर्का, महेश निष्ठारी,देशू तोरेम, बंडू तोरेम, शंकर गोंगले, तिरुपती दुर्गे, पवन तलांडे दिवकार आत्राम,सुनील बोडगेलवार,सदशिव गोंगले,राजेश दुर्गे,रोहित आत्राम,मीना आत्राम, शेवन्ता आत्राम, समक्का सिडाम, आशा सिडाम, अर्चना सिडाम, अंजली सिडाम, वर्षा अर्का, मंजुळा अर्का, रसिका बेबी अर्का, अर्का, वनिता अर्का, पुष्पा अर्का, छाया अर्का, तुलशी सिडाम, स्वाती अर्का, मैनावती सिडाम, मंगला सिडाम,आदी उपस्थित होते.

