Tuesday, February 24, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका मध्ये धम्मदेशना व उपवर – वधु परिचय मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 24, 2026
in Uncategorized
0 0
0
भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका मध्ये धम्मदेशना व उपवर – वधु परिचय  मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो .9764268694

राजुरा_ दि.22/02/2026 रोज रविवारला सकाळी 11.30 वाजता संविधान चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पूज्य भंते,उपासक,उपासिका, लेझिम पथक संविधान चौक ते बुद्ध भुमी पर्यंत पुष्प ने रैली चे स्वागत करण्यात आले.दोन दोन च्या लाइन लावून बुध्द भूमी बस स्टॉप समोर राजुरा येथे भिक्खू संघाची धम्मदेशना चे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले
सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार मेणबत्ती अगरबती लाऊन दीप प्रजलित करण्यात आले.भिक्खू संघानी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत गीता द्वारे अशोक दुबे सर नी स्वागत केले या कार्यक्रमात आयु.नेताजी भरणे माजी जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करून मार्गदर्शन केले.
भिक्खू संघानी धम्मदेशना पूज्य भदंत धम्मसारथी ,पूज्य भंते राहुलजी, पूज्य भंते राहुल बोधी नागपूर या भिक्खू संघानी धम्मदेशना देताना तथागत गौतम बुद्ध धम्म आणि बाबासाहेबा नी दिलेला 22 प्रतिज्ञा व पंचशील चे पालन केले तरच मानव समाजाच्या धम्माच्या प्रचार होईल त्यानंतर आद. मुरलीधर ताकसांडे यांनी भिक्खू संघानी जी धम्मदेशना दिली त्यांचे आपण सर्वांनी अवलोकन करावे असे अध्यक्षीय मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा ला प्रमुख पाहुणे आयु.नी. मेघाताई बोरकर, केंद्रीय शिक्षिका,विमलताई पडवेकर, संगीता शेंडे होते. पहिल्या सत्राचे प्रस्ताविक आद.गौतम जुलमे शहरअध्यक्ष आणि संचालन आद. इंजि.राहुल भगत ग्राम अध्यक्ष तर आभार प्रदर्शन आयु.नी. किरणताई खैरे यांनी केले.

दुसरे सत्रामध्ये बौद्ध धर्मीय वर वधु परिचय मेळावा.
सुरवातीला गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मान्यवरचा हस्ते दीप प्रजलीत करण्यात आले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आद.शंकर वेल्हेकर केंद्रीय शिक्षक चंद्रपूर,
आयु.नी.गीताताई पथाडे नगरसेवीका बालकल्याण सभापती आणि आयु.सिध्दार्थ भाऊ पथाडे नगरसेवक, धर्मुजी नगराळे तालुका अध्यक्ष या सर्वांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये राजुरा तालुक्यामध्ये व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली सामाजिक संस्था भारतीय बौध्द महासभा तालुका राजुरा कडून महाराष्ट्र मध्ये दुसऱ्यांदा बौध्द धर्मिय उपवर वधु परिचय मेळावा व धम्मदेशना, सांस्कृतिक,समाज प्रबोधन घेण्यात आला या करिता राजुरा तालुक्याचे अध्यक्ष आयु.धर्मुजी नगराळे व सर्व पदधिकरी यांचे अभिनंदन केले या वर वधु परिचय मेळाव्या मधून मुला मुलींना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळत असते या माध्यमातून मुला मुलीच्या शिक्षण,अपेक्षा काय असतात हे माहीत होते व काय असायला पाहिजे एकमेकाच्या समस्या जाणून समजून घेऊन योग्य जोडीदार चांगली वागणूक,आर्थिक,सामजिक, नैतिक,भौतिक, सर्व गुण संपन्न नसतात परंतु एकमेकांना आपला संसार कसा सुख समृध्दीने जगता येईल या बद्दल मार्गदर्शन करताना सर्व पदाधिकरी,उपासक,उपासिकाचे आभार व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धमाच्या प्रचार प्रसार करण्याकरीता भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस सर्वांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यामध्ये वर -वधु व त्यांच्या आई, वडील यांनी आपला मुला मुलींच्या परिचय दिला त्यानतंर प्रमुख पाहुणे मध्ये आद.सच्चिदानंद रामटेके संघटक,विजय जुलमे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,अमोल राऊत पत्रकार नवभारत,आयु.नी. संध्याताई चांदेकर नगरसेविका, उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु.भीमराव खोब्रागडे, उत्कृष्ट संचालन आयु. ॲड भीमराव दुर्गे व आभार प्रदर्शन आयु.गौतम देवगडे यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन धर्मुजी नगराळे यांनी केले तर गीत, नृत्य ,लेझिम पथक मध्ये भाग घेणाऱ्याना सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सहकार्य करणारे आद. धर्मुजी नगराळे,गौतम चौरे,गौतम देवगडे,प्रभाकर लोखंडे,मुरलीधर ताकसांडे,गौतम जुलमे, भीमराव खोब्रागडे,उत्तम रामटेके, ॲड .भीमराव दुर्गे, अशोक मेश्राम,सच्चिदानंद रामटेके,विजय जुलमे,सुधाकर पिंपरे,मिलिंद धोटे आणि चनाखा येथील लेझिम पथक इत्यादी व भारतीय बौद्ध महासभा ला दान, भिक्खू संघाला चिवरदान,लेझिम पथक चे कलेचे दान देणारे उपासक,उपसीका याचे अभिनंदन करण्यात आले. सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.राजुरा तालुक्यातील बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.शेवटी सरणत्य घेऊन नंतर भोजन दान देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आले आहे.

Previous Post

गरिबांचे मदतगार अजयभाऊ कंकडालवार.

Next Post

जनता दरबारात’ आम आदमी पार्टीचे निवेदन; शहरातील मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येवर कडक कारवाईची मागणी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
जनता दरबारात’ आम आदमी पार्टीचे निवेदन; शहरातील मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येवर कडक कारवाईची मागणी.

जनता दरबारात' आम आदमी पार्टीचे निवेदन; शहरातील मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येवर कडक कारवाईची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In